Homeशहर परिसरअखेर दिव्यातील रेल्वे तिकीट घरासमोर मोकळ्या जागेत छत उभारणीला सुरुवात

अखेर दिव्यातील रेल्वे तिकीट घरासमोर मोकळ्या जागेत छत उभारणीला सुरुवात

ठाणे: दिवा स्थानकातून मुंबई, कर्जत-कसारा, पनवेल, वसई कोकण च्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड आहे, शिवाय दिव्यातील बहुतांशी वर्ग हा रेल्वे सेवेवर अवलंबून आहे. दिवा रेल्वे स्थानकात एकमेव तिकीटघर असल्यामुळे त्या तिकीट घरासमोर तिकीट काढण्यासाठी लांबच रांगा लागतात.

अपुऱ्या जागेमुळे प्रवाशांच्या रांगा तिकीट घराबाहेर असणाऱ्या मोकळ्या जागेत जातात. तिकीट घराबाहेर छताची कोणतीही सुविधा नसल्यामुळे प्रवाशांना उन्हात-पावसात उभं राहावे लागत होते. त्यातून आता सुटका झाली असून त्या मोकळ्या जागेत छताचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना यश आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अँड.आदेश भगत यांनी दिली.

error: Content is protected !!