ठाणे: कळव्यातील घोलाई नगर येथून १६ वर्षीय दोन अल्पवयीन मुली गायब झाल्या आहेत. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्या दोन्ही मुलींना मराठी, हिंदी, पारधी भाषा बोलता येत असून त्यांच्या कपड्याची बॅग आहे. जर कोणास तट मुली आढळल्यास तर त्यांनी कळवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन कळवा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नंदलाल लोखंडे यांनी केले आहे. रुपाली संतोष पवार (१६) आणि दीपाली दत्ता पवार (१६) अशी त्या मुलींची नावे असून त्या कळवा पूर्व येथील गगनगिरी चाळीत राहणाऱ्या आहेत. दोघांची उंची 4 फूट 5 इंच इतकी असून रुपालीने आकाशी रंगाचा फ्रॉक तर दीपालीने गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केल्याचे पोलिसांनी सांगितले.






