Homeठाणे-मेट्रोएमडी व कोडीयनयुक्त कफ सिरफसह तिघांना अटक; एका नायजेरियनचा समावेश

एमडी व कोडीयनयुक्त कफ सिरफसह तिघांना अटक; एका नायजेरियनचा समावेश

ठाणे: एम डी (मॅफेड्रॉन ) पावडर तसेकंग कोडीयन युक्त कफ सिरफ या वेगवेगळ्या दोन अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात एका नायजेरियनसह तिघांना ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक करत, त्यांच्याकडून ६७ लाख १२ हजार ३७७ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटकेतील नायजेरियन हा अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात ६ वर्ष शिक्षा भोगून नोव्हेंबर २०२४ मध्ये कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा १२ जानेवारी २०२५ मध्ये अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी केलेल्या कारवाईत तो मिळून आल्याची माहिती पोलीस उपायुक्त ( गुन्हे शाखा) अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई मस्जिद बंदर रोड येथील जॉन जेम्स फ्रान्सिस उर्फ ओनाह चिडोझी एथलबर्ट उर्फ जॉन इझुग्वा फ्रान्सिस (४५) या नायजेरियन याला शीळ डायघर , देसाई नाका येथे केलेल्या कारवाई अटक केली. त्यांच्याकडून ६६ लाख १८ हजार रुपये किंमतीचे ६६१.८ ग्रॅम वजनाची एमडी पावडर मिळून आली. याप्रकरणी शीळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली तसेच येत्या १७ जानेवारी पर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. तर त्याच्या विरोधात बांद्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अंमली विरोधी पदार्थाच्या गुन्ह्यात तो सहा वर्षे शिक्षा भोगून बाहेर आलेला आहे. तसेच दुसऱ्या कारवाईत कोनगाव परिसरात कोडीयनयुक्त कफ सिरपच्या एकूण ४६७ बाटल्या विक्री करिता बेकायदेशीरपणे कब्जा बाळगणाऱ्या भिवंडीतील नौशाद अन्सार अहमद शेख (५५) आणि मोहम्मद तवकीर फारूक अन्सारी (२४) या दोघांना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या बाटल्यांची किंमत ८७ हजार ७७७ रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर अटकेतील नौशाद याच्यावर यापूर्वीही एनडीपीएस कायद्याअंतर्गत शांतिनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अटकेतील त्रिकुटाने एमडी व कफ सिरफचा साठा कुठून आणला आहे? त्यांचे आणखी साथीदार कोण आहेत ? याचा तपास पोलीस करत आहेत. एक कारवाई आमचे पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे जगदीश गावित पोलीस उपनिरीक्षक दीपेश किनी भोसले राजेंद्र निकम मोहन परब या पथकाने केली आहे

error: Content is protected !!