मुंबई:- राज्यात ओला दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी पुढे आले आहेत. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस (भटके विमुक्त आघाडी) श्री. शिवाजी आव्हाड यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांप्रति सामाजिक बांधिलकी जपत श्री. शिवाजी आव्हाड यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या आणि त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत मदतीचा धनादेश प्रदान केला.
या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार श्री. नरेंद्रजी पवार तसेच पक्षाचे अन्य प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. “शेतकरी हा राज्याचा कणा असून, तो संकटात असताना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे,” अशी भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.






