Homeठाणे-मेट्रोकलंकित मंत्री अन् हतबल मुख्यमंत्री

कलंकित मंत्री अन् हतबल मुख्यमंत्री

भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात ठाण्यात आज शिवसेनेचा एल्गार

ठाणे :- राज्याच्या सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात आज ठाण्यात शिवसेनेने एल्गार पुकारला. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे नेतृत्वाखाली आज ठाणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात भ्रष्टमंत्र्यांची कारनामे पथनाट्यातून तसेच वेशभूषातून दाखवण्यात आल्याने सर्वाचे लक्ष वेधले.
कलंकित मंत्री अन् हतबल मुख्यमंत्री अशीच सध्या सरकारची परिस्थिती असून या भ्रष्टमंध्रांना पाठीशी घातले जात आहे. या मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे शाखेने जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात शिवसैनिकांसह सामान्य नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते

सरकार भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्यात व्यस्त

ठाण्यातून गद्दारीला सुरूवात झाली आणि कशाप्रकारे या महाराष्ट्राला लुटण्याचे काम या लोकांनी केलेलं आहे. लाडक्या बहिणी असतील , शेतकरी हतबल झाले आहेत , रोजगार पळवल्याने तरुण वर्ग यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. महाराष्ट्रात मंत्र्यांचे डान्स बार सुरू आहेत कोणाचे लक्ष नाहीये खिसे भरण्याचे काम करत आहेत. मंत्री गादीवर बसून शेजारी भरलेल्या पैशांच्या बॅग ठेवून सिगरेटच्या धुरका उडताना , कृषी मंत्री रमी खेळण्यात बिझी आहेत , कॅन्टींग मध्ये बॉक्सिंग करतात काही मंत्री पालकमंत्री पदासाठी अघोरी बुवाबाजी करतात पण एकही मंत्र्याचा राजीनामा घेतला गेला नाही. त्यामुळे हे सरकार भ्रष्ट लोकांना पाठीशी घालण्या मध्ये व्यस्त आहे.
सत्तेचा व पैशाचा गैरवापर करून हे सरकार नव्या पिढीला देशोधडीला लावत आहे याचा निषेध आज करण्यात आला त्यावेळी संपर्कप्रमुख नरेश मनेरा , दिवा संपर्कप्रमुख रोहिदास मुंडे ,जिल्हाप्रमुख केदार दिघे ,महिला जिल्हा संघटक रेखाताई खोपकर, कळवा मुंब्रा विधानसभा संघटिका पुष्पालता भानुषाली, कळवा समन्वयक माजी नगरसेविका नीलिमा ताई शिंदे, ठाणे उपजिल्हाप्रमुख कृष्णकांत कोळी, सुनील पाटील, कल्याण उपजिल्हाप्रमुख विजय देसाई , समन्वयक संजय तरे,ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे ,दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, मुंब्रा शहर प्रमुख विजय कदम ,ठाणे उपशहर प्रमुख सचिन चव्हाण ,वसंत गव्हाळे ,परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक, विधानसभा संघटक चंद्रकांत विधाते , संजय ब्रीद, प्रमिलाताई भांगे नगरसेविका नंदिनी विचारे, नगरसेवक मंदार विचारे, तसेच वेशभूषा करणारे सर्व पदाधिकारी सर्व विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख व इतर शिवसेना पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!