ठाणे : आरे जंगलात होणाऱ्या मेट्रो कारशेडला विरोधात रविवारी सकाळी काॅंग्रेसच्या पर्यावरण विभाग ठाण्यात रस्त्यावर उतरत त्यांनी आरे वाचवा यासाठी आंदोलन केले. हे आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ दीप या निवासस्थानासमोर होणार होते. मात्र कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारल्याने ऐन्य वेळी हे आंदोलन कॅडबरी जंक्शन येथे करण्यात आले. यावेळी पोलिसांनी २० ते २५ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते.
हे आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ दीप या निवासस्थानासमोर होणार होते. मात्र कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारल्याने ऐन्य वेळी हे आंदोलन कॅडबरी जंक्शन येथे करण्यात आले.
राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) आरेच्या जंगलात कारशेड उभारण्यावर ठाम असल्याने आरे कारशेडला मोठा विरोध होत आहे. पर्यावरण संघटना आणि विविध राजकीय पक्षांपाठोपाठ रविवारी काँग्रेसच्या पर्यावरण विभागानेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन आयोजित केले होते. पण, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर काँग्रेसने शिंदे यांच्या निवासस्थानापासून सुमारे ५०० मीटर अंतरावरील कॅडबरी जंक्शन येथे आंदोलन केले. यावेळी आरे वाचवा अशी घोषणाबाजी केली. दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते.