Homeठाणे-मेट्रोकालबाह्य अन्नधान्यासह इतर मालाची विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश ; दोघांना अटक ठाणे गुन्हे...

कालबाह्य अन्नधान्यासह इतर मालाची विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश ; दोघांना अटक ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी

ठाणे :- ‘फ्लिपकार्ट कंपनी कडुन कालबाहय (Expiry Date) अन्नधान्य, कडधान्य, खाद्यपदार्थ, कॉस्मेटिक व सॅनेटरी प्रोडक्ट्स नाश करण्यासाठी आल्यावर त्याचा नाश न करता तो माल सुट्टा करून बाजारात विक्री करणाऱ्या इकोस्टार रिसायकलिंग कंपनीचा ठाणे शहर पोलिस दलाच्या ठाणे गुन्हे शाखेने
पर्दाफाश केला. तसेच याप्रकरणी मुंबई, साकीनाका येथील मोहंमद इरफान मोहमंद मुनीर चौधरी, (४१) आणि भिवंडीमधील मोहम्मद अक्रम मोहम्मद इस्माईल शेख (५८) यांना अटक केली असून त्यांच्याकडून ३० लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
” फ्लिपकार्ट कंपनी कडुन कालबाहय (Exipry Date) असलेले सर्व प्रकारचे कडधान्ये त्यांच्या डाळी,आटा, ड्रायफुटस्, साखर, तसेच चॉकलेट, कॉस्मेटिक, सॅनेटरी प्रॉडक्ट्स असा माल ठाणे, शीळ डायघर येथील दहिसर नाका येथील “इको स्टार रिसायकलिंग” या कंपनीत नाश करण्यासाठी पाठविला असताना, सदरचा माल नाश न करता त्या मालाची बेकायदेशीररित्या खुल्या बाजारामध्ये विक्री केली जाते. असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार, ठाणे गुन्हे शाखा आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रीयेचा अवलंब करून मुंब्रा-पुणे रोडवरील दहिसर नाका येथे इको स्टार रिसायकलिंग अॅण्ड इ वेस्ट रिसायकलिंग कंपनीचे आरिफ कंपाऊंड, गोडाऊन नं. ६ या ५३,००० चौरस फुट क्षेत्रफळाचे गोडावुन आणि पनवेल रोडवरील दहिसर येथील गरीब नवाज इस्टेट, फॅक्टरी नं. ६४२, सर्वे नं. ८, हिस्सा नंबर २/ए, या ३१,००० चौरस फुट क्षेत्रफळाचे गोडावुन मध्ये छापा टाकून ०९ आणि १० जुलै २०२५ असे सलग दोन्ही गोडावुन मध्ये तपासणी केली असता त्याठिकाणी फ्लिपकार्ट कंपनीकडुन नाश करण्यासाठी पाठविण्यात आलेला कालबाहय (Expiry Date) झालेले सर्व प्रकारचे अन्नधान्य, कडधान्य, विविध कंपन्यांचा आटा (पीठ), साखर, तांदुळ, सर्व प्रकारचे ड्रायफुट्स, टॉयलेट क्लिनर, सॅनेटरी पॅड, वॉशिंग पावडर, साबण असा अंदाजे २०० टन माल नाश न करता नमुद मालाच्या मुळ कंपनीचे आवरण फाइन त्यातील अंदाजे १२,००० किलो (१२ टन) वजनाचा असा सु” ३०,००,०००/- किं. चा माल सुट्टा करून तो साध्या प्लॅस्टीकच्या पारदर्शक पिशव्यांमध्ये व गोण्यांमध्ये विक्री करीता साठा करून ठेवल्याचे आणि नवकार रिसायकलिंग दहिसर मोरी, शिळ-डायघर, ठाणे या कंपनीचे बनावट डिलेव्हरी चलन तयार करून त्या डिलेव्हरी चलनाचा वापर माल वाहतुक करणाऱ्या ड्रायव्हर करवी भिवंडी व इतर परिसरात विक्री करीत असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी दोन्ही गोडाऊन मालकांविरोधात शीळ डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. तसेच त्यांना न्यायालयाने येत्या १४ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर दाखल गुन्हयात इतर कोणाचा सहभाग आहे अगर कसे? याबाबत तपास सुरू आहे. याप्रकरणी पुढील तपास ठाणे गुन्हे शाखा, घटक-१ हे करीत आहेत.

error: Content is protected !!