Homeठाणे-मेट्रोघरफोडीची हाफसेंच्युरी ; सराईत चोरट्यासह साथीदार पोलिसांच्या जाळ्यात

घरफोडीची हाफसेंच्युरी ; सराईत चोरट्यासह साथीदार पोलिसांच्या जाळ्यात

५४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत ; गुन्हे शाखेची कारवाई

ठाणे:- ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील कल्याण, ठाणे, भिंवडी, बदलापुर,अंबरनाथ परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत लक्ष्मण सुरेश शिवशरण (४७) या चोरट्यासह त्याचा साथीदार सुकेश मुददणा कोटीयन (५५ ) अशा दुकलीला ठाणे शहर पोलिसांनी अटक केली. यामधील लक्ष्मण शिवशरण याने ठाणे शहर आयुक्तालयातील जवळपास सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केलेल्या तब्बल ५० गुन्ह्यांची कबुली दिली. त्या गुन्ह्यांपैकी काही गुन्ह्यांमधील सोन्याचे दागिन्यांसह रोख रक्कम असा ५४ लाखांहून अधिकचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केला आहे. तो दिवसा किंवा रात्री बंद घरे फोडून चोरी करायचा याशिवाय त्याच्यावर यापूर्वी ३२ गुन्हे दाखल असल्याची माहिती ठाणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखा उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी मंगळवारी ठाण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास कल्याण गुन्हे शाखा करत होती. त्या गुन्हयातील घटनास्थळी व परिसरात असलेल्या सीसीटीव्ही. फुटेजाद्वारे संशयीत म्हणून भिवंडी मधील लक्ष्मण शिवशरण याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली देत, ते सोने त्याने सुकेश याला विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. त्यानुसार त्याला अटक केली. याचदरम्यान लक्ष्मण याने अशाप्रकारे एकूण ५० गुन्ह्यांची कबुली देत, त्यापैकी काही गुन्ह्यांमधील ५३ लाख ४१ हजार २८० रूपये किमंतीचे ६६७ग्रॅम, ६६० मी.ली. वजनाचे सोन्याचे दागिने व ७८ हजार ९०० रूपये रोख असा एकुण ५४ लाख २० हजार १८० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून एकुण ५० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. तसेच लक्ष्मण याच्यावर यापूर्वी ठाणे आणि नवीमुंबई पोलीस आयुक्तालयात ३२ गुन्हे दाखल आहेत. त्यामधील १ गुन्हा हा नवीमुंबई पोलीस आयुक्तालयातील वाशी एपीएमसी पोलीस ठाण्यातील आहे. तो मूळचा सोलापूर कर असून सध्या तो भिवंडी, कशेळी गावात राहत आहे. तर त्याचा साथीदार सुकेश हा मूळ मंगलोरचा असून सध्या तो मीरा भाईंदर परिसरात राहत आहे. यागुन्ह्यात अजून त्याचे काही साथीदार आहेत का? तसेच चोरीच्या इतर गुन्ह्यातील मुद्देमाल त्यांनी कुठे ठेवला किंवा विक्री केला याचा तपास सुरू आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली
कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, पोलीस अमलंदार दत्ताराम भोसले, अशोक पवार, बालाजी शिंदे, आदिक जाधव, विलास कडु, अनुप कामत, प्रंशात वानखेडे, गोरखनाथ पोटे, प्रविण बागुल, उल्हास खंडारे, सुधिर क़दम, वसंत चौरे, सचिन वानखेडे, दिपक महाजन, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, विजेंद्र नवसारे, विनोद चन्ने, गोरक्ष शेकडे, सतिश सोनवणे, महिला पोलीस अंमलदार ज्योत्स्ना कुंभारे, मिनाक्षी खेडेकर, मंगल गावित पोलीस उपनिरीक्षक अमोल बोरकर या पथकाने केली.

error: Content is protected !!