Homeकोकण-महाराष्ट्रजखमी गोविंदा प्रथमेश सावंत याला मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची मदत

जखमी गोविंदा प्रथमेश सावंत याला मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची मदत

ठाणे : दहींहंडीचे थर लावताना जखमी झालेल्या प्रथमेश सावंत या 22 वर्षांच्या गोविंदाला मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तीकरित्या पाच लाखांची मदत केली आहे. ही मदत शिवसेना प्रवक्ते व ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी प्रथमेश सावंत याला सुपुर्द केली. आणि शिवसेना त्याच्या पाठीशी असल्याचा दिलासा दिला.

      करीरोड येथील साईभक्त क्रीडा मंडळ गोविंदा पथकातील प्रथमेश सावंत हा गोविंदा थर लावताना पडल्याने जखमी झाला असून मणक्याच्या पॅरेलिसीसला सामोरे जावे लागले. प्रथमेश सावंत हा गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील के.ई. एम. रुग्णालयात उपचार घेत आहे. प्रथमेश सावंत याचे आईवडील नसून त्याचा सांभाळ नातेवाईक करीत आहे. त्याला आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्त‍िकरित्या त्याला पाच लाखांची मदत केली आहे.

शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आज के.ई.एम. रुग्णालयात प्रथमेश सावंत याची भेट घेवून त्याची विचारपूस केली व पाच लाखांची मदत सुपुर्द केली. सरकार त्याच्या पाठीशी आहेच, परंतु शिवसेना सदैव त्याच्या सोबत असल्याची ग्वाही त्याला म्हस्के यांनी दिली. 

यावेळी प्रथमेश सावंत याचे नातेवाईक, के.ई.एम. रुग्णालयाचे अधिष्ठाता, रुग्णालय प्रशासन व साईभक्त क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व टेंभीनाका उपविभागप्रमुख स्वानंद पवार, शाखाप्रमुख नितीन बुडजडे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे हे सतत प्रथमेश सावंत याच्या तब्बेतीकडे लक्ष ठेवून असल्याबाबत व त्याला वैयक्त‍िकरित्या पाच लाखांची मदत केल्याबद्दल प्रथमेशचे नातेवाईक व साईभक्त क्रीडा मंडळाच्या गोविंदा पथकांने त्यांचे आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!