दिवा:-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहराच्या वतीने चला आपणही देश कर्तव्य पार पाडूया रक्तदान करूया या ब्रीदवाक्या खाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी शेकडो नागरिकांनी रक्त दान शिबीरात सहभाग घेतला.
या शिबिराचे आयोजन शहरप्रमुख सचिन पाटील यांनी केले. यावेळेस जिल्हा संघटक तात्या माने, विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे, शिक्षक सेनेचे सह सचिव मारुती पडळकर सर, डोंबिवली उपशहर प्रमुख जगदीश जुलूम, शहर संघटिका ज्योती पाटील, युवासेना शहर सचिव उमेश राठोड, विभाग प्रमुख चेतन पाटील, हेमंत नाईक, शनिदास पाटील, नागेश पवार, रवी रसाळ, युवा उपशहर अधिकारी सुयोग राणे व दिवा शहरातील सर्व शाखाप्रमुख, शिवसेना युवासेना महिला आघाडी समस्त कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.






