Homeठाणे-मेट्रोठाण्याच्या कॅडबरी जंक्शनवरच रोड अपघात; एकाला किरकोळ दुखापत

ठाण्याच्या कॅडबरी जंक्शनवरच रोड अपघात; एकाला किरकोळ दुखापत

ठाणे :- सिग्नलवर उभ्या असलेल्या गाड्यांना भरधाव वेगाने पाठी मागून आलेल्या एका चारचाकी कारने जोरदार धडक दिली. तीन गाड्यांच्या या विचित्र अपघातात धडक देणाऱ्या कारचे मालक आणि चालक अनिल पुनखिया हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ही घटना बुधवारी रात्री सव्वा अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मुंबई- नाशिक महामार्गावरील नाशिककडे जाणाऱ्या वाहिनीवरील कॅडबरी सिग्नल येथे घडली. या अपघातामुळे त्या वाहनांमधील ऑईल रस्त्यावर पसरल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
जखमी पुनखिया हे कारने वरळी येथून घोडबंदर रोडकडे निघाले होते. याचदरम्यान त्यांचा कारवरील ताबा सुटला. त्यावेळी कॅडबरी जंक्शन येथे सिग्नल असल्याने गाड्या उभ्या होत्या. त्यांना जाऊन पुनखिया याची कार जोरात धडकली. एकामागून एक अशा तीन कार एकमेकांना धडकल्याने त्या कारमधील ऑईल रस्त्यावर पसरले. तसेच एक जण किरकोळ जखमी झाला आहे. अशी माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन , वाहतूक पोलिसांनी धाव घेतली. तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या रस्त्यावर पसरलेल्या ऑईल वर माती टाकून अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या एका बाजूला करत तो रस्त्या वाहतुकीसाठी मोकळा करून दिला. ज्या कारने इतर दोन गाड्यांना धडक दिली त्यामध्ये कार चालकासह इतर तीन जण प्रवास करत होते. तर इतर दोन गाड्यांमध्ये त्यांचे चालक हे एकटेच प्रवास करत होते, त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

error: Content is protected !!