Homeठाणे-मेट्रोठाण्यात पकडला १.५६ कोटींची गोवा निर्मित मद्याचा साठा; एकाला अटक

ठाण्यात पकडला १.५६ कोटींची गोवा निर्मित मद्याचा साठा; एकाला अटक

ठाणे :- परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी (गोवा राज्यात निर्मित) मद्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालक मोहम्मद समशाद सलमानी याला ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली. तसेच गोवा निर्मित मद्याचे १ हजार ४०० बॉक्ससह टेम्पो असा १ कोटी ५६ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे जिल्हा अधीक्षक प्रवीण तांबे यांनी दिली.
परराज्यातील (गोवा) मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे ३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी खारेगाव ते ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून संशयस्पद टेम्पो थांबवून तपासणी केली असता, त्या टेम्पोच्या आतमध्ये परराज्यातील भारतीय बनावट विदेशी मद्याचे (गोवा राज्यात निर्मित) एक हजार ४०० बॉक्स असल्याचे दिसून आले. त्यानंतर दारूबंदी गुन्हयाअंतर्गत त्या बॉक्ससह टेम्पो असा एकूण कोटी ५६ लाख ६३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्रमांक १ चे निरीक्षक एम.पी. धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक
एन.आर.महाले, एस.आर.मिसाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक बी जी थोरात, जवान पी एस नागरे,पी ए महाजन,व्ही के पाटील, एस एस यादव,एम जी शेख या पथकाने केली.

error: Content is protected !!