दातीवली:- दातिवली येथील हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा 20 व 21 मे रोजी मोठ्या भक्ती भावाने साजरा होणार आहे.
या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दातिवली ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
जीर्णोद्धार सोहळ्याच्या निमित्ताने मंदिराची वास्तुशांती व होम हवन ,चक्रीय भजन,श्रींची मिरवणूक व गाव प्रदक्षिणा, महाप्रसाद असे कार्यक्रम शनिवार 20 मे रोजी आयोजित करण्यात आले आहेत. तर दुसऱ्या दिवशी 21 मे रोजी कलश पूजन, श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना,होम हवन, महिलांसाठी विशेष कार्यक्रम खेळ पैठणीचा, हरिपाठ, कीर्तन, भंडारा व ऑर्केस्ट्रा अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात सभामंडप उभारण्यात आले असून शुशोभीकरण देखील करण्यात आले आहे.






