Homeठाणे-मेट्रोदिवा प्रभाग २७ मध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजयाचा विश्वास

दिवा प्रभाग २७ मध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजयाचा विश्वास

दिवा:- येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिव्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, प्रभाग क्रमांक २७ मध्ये शिवसेना (शिंदे गट) आपली संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करताना दिसत आहे. शिवसेनेचे उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली या प्रभागात शिवसेनेला मोठे यश मिळेल, असा ठाम विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

निवडणुका जाहीर होताच शैलेश पाटील ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी प्रभागातील प्रमुख कार्यकर्त्यांची तातडीने बैठक घेऊन निवडणुकीच्या नियोजनाचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला विशिष्ट जबाबदारी नेमून दिली असून, प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दिव्यात रस्ते उत्तम दर्जाचे झाले असून पाणी योजने बाबत काम झाले आहे.जी कामे अर्धवट आहेत ती लवकरच पूर्ण होतील आणि नागरी सुविधांची अनेक कामे पूर्ण झाली आहेत असे शैलेश पाटील यांनी सांगितले.

प्रभाग २७ मध्ये शिवसेनेची संघटनात्मक पकड मजबूत असून, गेल्या काही काळापासून जनसंपर्कावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुकीत नागरिक मोठ्या संख्येने शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतील आणि भगवा फडकवतील, अशी खात्री कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!