Homeठाणे-मेट्रोदिवा येथे स्वतंत्र पोलिस स्टेशन सुरू करण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्तांना विजय भोईर...

दिवा येथे स्वतंत्र पोलिस स्टेशन सुरू करण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्तांना विजय भोईर यांचे निवेदन

ठाणे:- बुधवारी विजय भोईर यांनी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी भेट घेऊन दिव्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल तसेच ६ लाखाच्या वर झालेल्या लोकसंख्येला सध्याचे पोलिस बळ कसे अपुरे पडत आहे हे निदर्शनास आणून दिले.त्यावर आयुक्त यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आणि तातडीने आपली मागणी पूर्ण करण्यासाठी जातीने लक्ष घालू असा शब्द दिला असल्याची माहिती विजय भोईर यांनी दिली.
पोलीस आयुक्त यांनी त्यांच्या यंत्रणेला त्या अनुषंगाने ताबडतोब फोन करून सूचना दिल्या आहेत. आयुक्त साहेबांनी ज्या प्रकारे दिव्यातील गुन्हेगारी, गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी आणि दिवावासीयांच्या सुरक्षेबाबत दखल घेतली असेही भोईर म्हणाले.यावेळी भाजपचे माजी गटनेते, नगरसेवक श्री. मनोहर डुंबरे उपस्थित होते.तसेच सुरेश चौधरी,अजित सानप देखील उपस्थित होते.

error: Content is protected !!