Homeठाणे-मेट्रोदिव्यात तन्वी फाउंडेशनतर्फे दहीहंडी सराव शिबिर; जय मल्हार गोविंदा पथक ठरले विजेते

दिव्यात तन्वी फाउंडेशनतर्फे दहीहंडी सराव शिबिर; जय मल्हार गोविंदा पथक ठरले विजेते

ठाणे: दिवा शहरात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असून, नुकतेच येथील तन्वी फाउंडेशनने गोविंदा पथकांसाठी एका खास सराव शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात दिवा शहरातील तब्बल ४५ गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. या शिबिरात थर रचण्याच्या स्पर्धेत जय मल्हार गोविंदा पथकाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला.

तन्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती पाटील यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या फाउंडेशनने तरुणांनाही व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या शिबिरात गोविंदा पथकांनी पाच ते सात थर रचून आपले कौशल्य आणि मनोबल दाखवून दिले.
या स्पर्धेत सात थर रचून गणेश नगर येथील जय मल्हार गोविंदा पथकाने पहिला क्रमांक मिळवला. दुसरा क्रमांक आई एकविरा गोविंदा पथकाने पटकावला, तर आम्ही दिवेकर गोविंदा पथक तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
या कार्यक्रमाला दिवा शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ज्योती पाटील यांनी, “दिवा शहराचा विकास घडवण्यासाठी येथील तरुणांनीच पुढाकार घ्यावा. तन्वी फाउंडेशन यापुढेही तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी असेच सामाजिक उपक्रम राबवत राहील,” असे सांगितले.

error: Content is protected !!