Homeठाणे-मेट्रोदिव्यात भाजपची भव्य पदयात्रा; माजी आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ

दिव्यात भाजपची भव्य पदयात्रा; माजी आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ

दिवा:भारतीय जनता पार्टीचे श्रद्धास्थान आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिवा शहरात भाजपच्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेदरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला.

अटलजींच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी काढण्यात आलेल्या या पदयात्रेत कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह दिसून आला.

या कार्यक्रमाला भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि स्थानिक नेते उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने सचिन भोईर, अशोक पाटील, विजय भोईर
विनोद भगत, सतीश केळशीकर, रोशन भगत,सपना भगत, सीमा भगत, रेश्मा पवार,यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.

प्रचाराचा नारळ फुटल्यामुळे आता येणाऱ्या काळात भाजप दिव्यात अधिक आक्रमकपणे घरोघरी पोहोचणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पदयात्रेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, आगामी निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

error: Content is protected !!