Homeशहर परिसरनिलेश पाटील यांच्या वतीने आधार कार्ड शिबिराचे आयोजन

निलेश पाटील यांच्या वतीने आधार कार्ड शिबिराचे आयोजन

दिवा:-शिवसेनेच्या वतीने साबेगाव येथे मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. निलेश पाटील व अर्चना पाटील यांनी या शिबिराचे आयोजन केले असून नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

6 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत हे शिबिर डीजे कॉम्प्लेक्स येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयात हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात नवीन आधार कार्ड काढून देणे, नावात बदल,पत्ता बदल, आधारला मोबाईल लिंक करून देणे इत्यादी कामे मोफत करून दिली जाणार असल्याचे आयोजक निलेश पाटील व अर्चना पाटील यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!