Homeशहर परिसरप्रभाग क्रमांक २७ मध्ये शिवसेनेचा भगवा फडकणारच; आरक्षण सोडतीनंतर माजी नगरसेवक शैलेश...

प्रभाग क्रमांक २७ मध्ये शिवसेनेचा भगवा फडकणारच; आरक्षण सोडतीनंतर माजी नगरसेवक शैलेश पाटील यांचा विश्वास

दिवा:- ठाणे महानगरपालिकेची आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक २७ मधील सर्व जागा शिवसेना एकहाती जिंकेल, असा ठाम विश्वास शिवसेनेचे उपशहर प्रमुख तथा माजी नगरसेवक शैलेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.

दिवा शिवसेनेचा गड, मोठी ताकद:
आरक्षण सोडत जाहीर होताच प्रतिक्रिया देताना शैलेश पाटील म्हणाले की, “दिवा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या प्रभाग क्रमांक २७ मध्ये शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर आहे.”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने शिवसेनेचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक जनतेपर्यंत पोहोचले आहेत.मागील पाच वर्षांत ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व नगरसेवकांनी केलेली विकास कामे आणि पुढील प्रस्तावित कामे जनतेच्या लक्षात आहेत.
“या सर्व सकारात्मक गोष्टी लक्षात घेता, आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २७ मध्ये शिवसेनेचा भगवा मोठ्या डौलाने फडकेल,” असा ठाम विश्वास शैलेश पाटील यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!