Homeठाणे-मेट्रोप्रभाग संवाद उपक्रमातून ज्योती पाटील यांचा जनसंपर्क दौरा; शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक...

प्रभाग संवाद उपक्रमातून ज्योती पाटील यांचा जनसंपर्क दौरा; शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक निवडून आल्यास एक वर्षात पाणीप्रश्न सोडविण्याचा शब्द

दिवा शहर संघटिका ज्योती पाटील यांच्याकडून प्रभाग क्रमांक 28 मध्ये प्रभाग संवाद दौरा सुरू

दिवा :- ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले आहे. दिवा शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला असून, महिला संघटिका ज्योती पाटील यांनी प्रभाग क्रमांक २८ मध्ये प्रचाराचा नवा आणि प्रभावी मार्ग अवलंबला आहे. ‘प्रभाग संवाद’ या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी थेट नागरिकांच्या दारात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर भर दिला आहे.

थेट जनतेच्या दरबारात ‘प्रभाग संवाद’ :
नेहमीच्या सभा आणि रॅलींच्या पलीकडे जाऊन ज्योती पाटील यांनी प्रभागातील गल्लीबोळात आणि सोसायट्यांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमाला ‘प्रभाग संवाद’ असे नाव देण्यात आले असून, यात पक्षाची भूमिका मांडताना, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, रखडलेली विकासकामे आणि प्रशासकीय अनास्था यावर चर्चा केली जात आहे.

पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सुटणार: ज्योती पाटील यांचा ठाम विश्वास:
शहरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे पाणीटंचाई. याच मुद्द्यावर बोट ठेवत ज्योती पाटील यांनी नागरिकांना आश्वस्त केले की, “महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक निवडून आल्यास दिवा शहराचा चेहरामोहरा बदलला जाईल. पहिल्या एका वर्षात दिव्यातील पाणीटंचाई कायमस्वरूपी निकालात काढली जाईल.” या आश्वासनामुळे प्रभाग क्रमांक 28 मधील स्थानिक महिला आणि नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिवसैनिक मैदानात:
या जनसंपर्क मोहिमेत ज्योती पाटील यांच्यासोबत शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. घरोघरी जाऊन पक्षाची ध्येयधोरणे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे. दिव्यातील नागरी समस्या सोडवण्यासाठी केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच सक्षम असल्याचा दावा यावेळी कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:
प्रभाग क्रमांक २८ मधील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. लोकप्रतिनिधी केवळ निवडणुकीपुरते न येता, आमच्या समस्या ऐकून घेण्यासाठी प्रभाग संवाद साधत असल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!