Homeशहर परिसरबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ज्योती पाटील यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ज्योती पाटील यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन

दिवा:-हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दिवा शहर संघटिका ज्योती पाटील यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

80 टक्के समाजकारण 20% राजकारण या बाळासाहेब ठाकरे यांच्या धोरणानुसार प्रभागातील नागरिकांसाठी ज्योती पाटील यांच्या वतीने विविध उपक्रम आयोजित करण्यात येत असतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांना नागरिकांनी उपस्थिती लावली. यावेळी शहरातील नागरिकांसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड व नवीन मतदार नोंदणी शिबिर त्याचबरोबर आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रभागातील नागरिकांनी या लोकोपयोगी उपक्रमांचा यावेळी लाभ घेतला.यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख नागेश पवार,उपविभाग प्रमुख संजय अदलकर,विभाग संघटिका सुहासिनी गुळेकर,
विभाग संघटिका वृषाली साळुंखे ,उपशाखा संघटिका शोभा तारले ,वैशाली अदलकर,अजित माने, अशोक आंबोणकर, दीपक उतेकर,शैलेश कदम ,संजय निकम,विलास उतेकर आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!