Homeशहर परिसरमनसेचे प्रकाश पाटील यांची प्रभाग क्रमांक 45 च्या विभाग अध्यक्षपदी नियुक्ती

मनसेचे प्रकाश पाटील यांची प्रभाग क्रमांक 45 च्या विभाग अध्यक्षपदी नियुक्ती

दिवा:-दिव्यातील मनसेचे युवा व डॅशिंग कार्यकर्ते प्रकाश पाटील यांची प्रभाग क्रमांक 45 च्या विभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रकाश पाटील हे मागील अनेक वर्षापासून मनसेमध्ये सक्रिय आहेत. मनसे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश पाटील हे पक्ष संघटनेत अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या पक्ष कार्याची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्ष नेतृत्वाने प्रकाश पाटील यांच्यावर दिवा शहर प्रभाग क्रमांक 45 च्या विभाग अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. दिव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देत असून नुकत्याच दिवा शहरातील विविध पद नियुक्त्या संघटनेमार्फत जाहीर करण्यात आले आहेत.

error: Content is protected !!