दिवा:- राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रेरणेने आणि कार्यसम्राट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून श्रीमती यशोदा बाळाराम पाटील नगर, साबे येथील नागरिकांची एक महत्त्वाची मागणी पूर्ण होत आहे. येथील बाळाराम अपार्टमेंट ते किआरा हाईट्स पर्यंत २५० मीटर लांबीच्या अंतर्गत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण काम सुरू आहे, या कामाची नुकतीच निलेश पाटील यांनी पाहणी केली.
माजी उपमहापौर रमाकांत मढवी आणि सर्व नगरसेवक, पदाधिकारी यांच्या अथक प्रयत्नातून तसेच निलेश पाटील यांच्या मागणीनुसार या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
प्रशासकीय आणि राजकीय स्तरावरून पाठपुरावा झाल्यामुळे या भागातील नागरिकांची जुनी मागणी पूर्णत्वास जात आहे. सिमेंट काँक्रिटीकरणामुळे रस्त्याची गुणवत्ता वाढणार असून नागरिकांची दळणवळणाची समस्या दूर होणार आहे.
या विकासकामामुळे श्रीमती यशोदा बाळाराम पाटील नगर येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले असून, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी उपमहापौर रमाकांत मढवी आणि सर्व संबंधितांचे आभार मानले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागामुळे साबे परिसरातील विकासकामांना गती मिळत असल्याचे यावेळी दिसून आले.






