Homeठाणे-मेट्रोराष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या नियुक्त्या जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या नियुक्त्या जाहीर

सदस्य नोंदणी अभियान राबविणार – सुहास देसाई

ठाणे :- पक्षवाढीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाणे शहरातील विविध सेलच्या नियुक्त्या जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी नुकत्याच जाहीर केल्या. सर्व नवनियुक्त सेलच्या अध्यक्षांना देसाई आणि पाटील यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले. दरम्यान, पक्षवाढीसाठी ठाणे शहरात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याचे सुहास देसाई यांनी सांगितले.

विधीमंडळ गटनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशावरून आणि मार्गदर्शनाखाली तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई आणि ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी सेल ठाणे जिल्हा अध्यक्षपदी संजीव दत्ता, हॉकर्स सेल ठाणे जिल्हा अध्यक्षपदी विक्रम सिंह, हॉकर्स सेल ठाणे जिल्हा कार्याध्यक्षपदी मनीषा म्हात्रे, सोशल मीडिया सेल ठाणे अध्यक्षपदी आशिष शर्मा, डॉक्टर सेल ठाणे जिअध्यक्षपदी डाॅ. सुभाष यादव, ज्येष्ठ नागरिक सेल ठाणे अध्यक्षपदी दिलीप नाईक, ज्येष्ठ सेल ठाणे जिल्हा कार्याध्यक्षपदी दिलीप लोखंडे, असंघटित कामगार सेल ठाणे अध्यक्षपदी राजू यशवंत चापले, असंघटित कामगार सेल ठाणे जिल्हा कार्याध्यक्षपदी सुनील गुरव, सहकार सेल अध्यक्षपदी नारायण उतेकर, लीगल सेल ठाणे अध्यक्षपदी विनोद उतेकर, सिख समाज सेल अध्यक्षपदी जगत सिंग परोचे, वाल्मिक समाज सेल अध्यक्षपदी हरिवंश चौहान, वाल्मीक समाज सेल ठाणे जिल्हा कार्याध्यक्षपदी हरीओम चौटेला, ग्रंथालय सेल अध्यक्षपदी वर्षा साबळे यांची नियुक्ती करण्यात आली . त्यांना पद नियुक्ती पत्र सुहास देसाई आणि प्रकाश पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

दरम्यान, डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष पूर्ण ताकदीने ठाणे महानगर पालिकेची निवडणूक लढविणार आहे. ठाणेकरांमध्ये सत्ताधारी वर्गाविरोधात असंतोष आहे. ठाणेकरांना आपण सक्षम पर्याय देणार असून त्यासाठी जनमानसांत फिरणार आहोत. शिवाय, सक्रीय कार्यकर्त्यांची फळी उभी केली जाणार आहे, असे सुहास देसाई यांनी सांगितले.

या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मकासुद खान, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस राजेश कदम, जिल्हा सरचिटणीस राजेश ज. साटम, एकनाथ जाधव, रिंकू सिंह, कैलास सुरकर, संदीप यादव, धर्मेंद्र अस्थाना, इकबाल शेख, संजय कांबळी, शिवा कालू सिंह, वैभव खोत, सुरेश सिंह, अंकुश मढवी, समाधान माने, पद्माकर पाटील, कुणाल कुडके, श्री. केतन जेधे, राहुल पाटील,जयेश पाटील तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते ही उपस्थित होते.

error: Content is protected !!