Homeशहर परिसरवंचित बहुजन आघाडीचा दिवा शहरात विस्तार; सौ. गाथा इंगळे यांची शहर उपाध्यक्षपदी...

वंचित बहुजन आघाडीचा दिवा शहरात विस्तार; सौ. गाथा इंगळे यांची शहर उपाध्यक्षपदी निवड

दिवा : – वंचित बहुजन आघाडीने दिवा शहरात आपली संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कंबर कसली असून, पक्षविस्ताराच्या मोहीमेअंतर्गत नव्या आणि तडफदार चेहऱ्यांना पक्षात संधी देण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर सौ. गाथा विकास इंगळे यांची ‘वंचित बहुजन आघाडी’च्या दिवा शहर उपाध्यक्ष पदी महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर आणि ठाणे शहर अध्यक्ष महेंद्र अनभोरे यांच्या आदेशानुसार व सूचनेनुसार ही निवड जाहीर करण्यात आली आहे. दिवा शहरात पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणीसाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
या नियुक्तीप्रसंगी पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने महासचिव मोहन नाईक, कल्याण ग्रामीणचे विकास इंगळे, प्रल्हाद म्हस्के, संदीप खरात, संभाजीराव वानखड़े, राजू दावरे, रवि कांबले, सुरेश पवार, संतोष गणेश पवार आणि पंडगाले आदींचा समावेश होता.

error: Content is protected !!