शिवसेना नेते राजन विचारे यांची मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांकडे मागणी
ठाणे :- मीरा-भाईंदर शहरात शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी इलेक्ट्रिक सिगारेटचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात दिसून येत आहेत. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी मंगळवारी नव्याने नियुक्त झालेल्या मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना शुभेच्छा देऊन मीरा-भाईंदर शहरातील शाळा कॉलेज परिसरातील पानटपरीवर इलेक्ट्रिक सिगारेट विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी विचारे यांनी पत्राद्वारे केली आहे. तसेच पान टपरीवर ई सिगारेट विकणाऱ्याना
पोलिसी खाक्या दाखवा अशी मागणी देखील राजन विचारे यांनी केली आहे. यावेळी संपर्कप्रमुख नरेश मनेरा, मीरा-भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे उपजिल्हाप्रमुख मनोज मयेकर महिला आघाडी नीलम धवन , प्रकाश जैन उपस्थित होते.
या दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी मीरा-भाईंदर शहरातील वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे अनधिकृत अनेक शाळा व कॉलेज त्याचबरोबर क्लासेस यांचेही प्रमाण तितकेच वाढलेले असल्याने प्रशासनाचे अंकुश सुटल्याने मुलांकडे शिस्तीचे धडे देणे याकडे शिक्षकांचे दुर्लक्ष झाले आहे कारण यापूर्वी कॉलेज पासून मुलांना अमली पदार्थाचे व्यसन सुरू होत होते परंतु आता इयत्ता पाचवी ते सातवी पासुनच मुलांना अमली पदार्थाचे व्यसन सुरू झाले आहे
सध्या मुलं वयात येण्याची प्रक्रिया अधिक वेगाने वाढत असल्याने सोशल मीडियाचा आधार घेऊन मुलांमध्ये लैंगिक इच्छा होणे, दारू पिऊन बघणे ,गांजा पिऊन बघणे तसेच सिगारेटच झुरका मारणे अशी ओढ मुलांमध्ये अधिक दिवसेंदिवस वाढत चालली आहे तसेच नव्याने सुरू झालेली वेगवेगळ्या फेवरमध्ये इलेक्ट्रिक सिगारेट या पान टपरीवर विक्री केल्या जातात. व याचीच सुरुवात सिगारेट व गांजा यामध्ये होत आहे त्यामुळे पान टपरी बरोबर सायकलवर विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करून त्यांना जेलबंद करा तसेच शाळा कॉलेज परिसरात पोलिसांची ग्रस्त वाढून एखादा विद्यार्थी जर नशा करताना दिसल्यास शाळेची प्रतिमा नष्ट होईल याचा विचार न करता त्या मुलाला त्यांच्या आई-वडिलांना स्वाधीन करून त्यांना योग्य समज द्या अशी मागणी मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांकडे शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केली आहे यासंदर्भात लवकरच ठाणे व नवी मुंबई पोलीस आयुक्तांची ही भेट घेणार आहे असे सांगण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाकडून गुटखा व्यतिरिक्त अद्याप कोणतेही कारवाई केली जात नाही यासाठी शासनाने धोरण निश्चित केले पाहिजे व यांच्यावर बंदी घातली पाहिजे- राजन विचारे माजी खासदार