Homeठाणे-मेट्रोशिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना सिक्युरिटी ; ठाण्यात गुन्हेगारी फोफावली

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना सिक्युरिटी ; ठाण्यात गुन्हेगारी फोफावली

शिवसेना नेते राजन विचारे यांचा आरोप

ठाणे:- शहरात खून, दरोडे, चोऱ्याचे प्रमाण वाढले आहेत. अत्यंत वर्दळीचा परिसर असलेल्या टेंभीनाक्या जवळील चरई परिसरात एका रात्रीत तब्बल १४ दुकाने चोरांनी फोडली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये मनुष्यबळ कमी असताना, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना सिक्युरिटी दिली जात आहे. त्यामुळेच ठाण्यात गुन्हेगारी फोफावली आहे. असा आरोप उबाठाचे नेते राजन विचारे यांनी केला आहे.
गुरुवारी शिवसेना नेते राजन विचारे यांच्यासह ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आदी पदाधिकाऱ्यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेतली. तसेच चरई पडलेल्या तब्बल १४ दुकानांसंदर्भात निवेदन दिले आहे. यावेळी विचारे यांनी वरील आरोप केला आहे. एकाच रात्री १४ दुकाने फोडल्याने त्या परिसरातील नागरिकांमध्ये व व्यापारी, व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिलेली आहेत. तात्काळ याची दखल घेऊन या चोरास जेरबंद करावे. तसेच पोलीस बळ वाढवून संपूर्ण ठाणे शहरात रात्रीची पोलिसांची गस्त वाढवावी जेणेकरून चोरीचे प्रमाण व गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. असेही विचारे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

error: Content is protected !!