दिवा:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशिर्वादाने आणि कार्यसम्राट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून दिवा शहरातील राधाकृष्ण सोसायटी ते विष्णू पाटील नगर साबे या मुख्य रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी कामामुळे परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
स्थानिक नेत्यांच्या प्रयत्नाने कामाला गती:
माजी उपमहापौर रमाकांत मढवी व दिवा शहरातील सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्या प्रयत्नाने या रस्ता कॉंक्रिटीकरण कामाला गती मिळाली आहे. रस्त्याच्या मजबुतीकरणामुळे पावसाळ्यात होणारी गैरसोय दूर होणार आहे.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी:
या रस्ता कॉंक्रिटीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे विभाग प्रमुख निलेश पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट दिली. कामाच्या गुणवत्तेची आणि प्रगतीची त्यांनी माहिती घेतली.
यावेळी निलेश पाटील यांच्यासोबत विभागप्रमुख गुरुनाथ पाटील, उपविभाग प्रमुख संतोष हळदणकर, शाखाप्रमुख महेश पाटील आणि महिला पदाधिकारी अमृता दुमडे हे उपस्थित होते. निलेश पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,
जनतेच्या सोयीसाठी विकासकामे वेगाने पूर्ण करण्याचा स्थानिक नेतृत्वाचा मानस आहे.






