साबे:- साबे गावातील गावदेवी चिचुआई मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा 22 ते 24 मे दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन साबे गाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
गावदेवी चिचुआई मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून यामध्ये 22 मे रोजी होम हवन,भजन,23 मे रोजी होम हवन व गावदेवी पालखी सोहळा,तर 24 मे रोजी जीर्णोद्धार विधी व महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक साबे गाव ग्रामस्थांनी केले आहे.






