Homeशहर परिसरअखेर रेश्मा खरात यांना त्यांचे घर मिळाले,आंदोलनात सहकार्य करणाऱ्यांचे खरात यांनी मानले...

अखेर रेश्मा खरात यांना त्यांचे घर मिळाले,आंदोलनात सहकार्य करणाऱ्यांचे खरात यांनी मानले आभार!

दिवा:- रेश्मा खरात या सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या महिलेला घरातून सामानासह जबरदस्तीने बाहेर काढण्याच्या निषेधार्थ रेश्मा खरात उपोषणाला बसल्या होत्या. अखेर त्यांनी सुरू केलेल्या लढ्याला यश आले असून त्यांचे हक्काचे घर त्यांना परत मिळाले आहे.
आंदोलनात सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे रेश्मा खरात यांनी आभार मानले आहेत.

मागील दोन दिवसांपासून रेश्मा खरात यांचे आंदोलन सुरू होते.त्यांच्या या आंदोलनाला दिव्यातील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. अमोल केंद्रे व आरपीआय आठवले गटाचे दिव्यातील नेते रेश्मा खरात यांच्यासह आंदोलनात उतरले होते.अखेर या आंदोलनाला यश आले असून रेश्मा खरात यांना त्यांचे घर परत मिळाले आहे.
रेश्मा खरात यांनी ज्या घर मालका कडून घर विकत घेतले होते त्याच मालकाने हे घर सतिश केळशिकर यांना विकले होते.खरात यांनी अर्धी रक्कम मालकाला दिली होती आता भाजपचे केळशिकर यांना खरात यांनी उर्वरित रक्कम चेक स्वरूपात दिली असून खरात यांना घराचा ताबा मिळाला आहे.अशी माहिती भाजपचे विजय भोईर यांनी दिवा न्यूज शी बोलताना दिली.

.

error: Content is protected !!