ठाणे:- कार्यकर्ता हीच आपली ताकद आहे, असे सर्वच राजकीय नेते म्हणत असतात. मात्र, कार्यकर्त्यांच्या भावनांना विशेष महत्व देऊन त्यांच्या सुख – दुःखात सहभागी होणारे नेते म्हणून डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्याचा प्रत्यय सोमवारी ठाणे महानगर पालिका मुख्यालयात आला. माता रमाई नगर, तुर्फे पाडा, ब्रम्हांड येथे राहणारा शिवाजी सिद्धार्थ वाघमारे हा तरूण स्विगीमध्ये डिलीव्हरी बाॅय म्हणून काम करीत होता. नुकतीच त्याने रिक्षा घेतली. आज या रिक्षाची डिलीव्हरी मिळाल्यानंतर डाॅ.जितेंद्र आव्हाड यांना आपली नवीन रिक्षा दाखविण्यासाठी तो ठाणे महानगर पालिकेजवळ आला. डाॅ.जितेंद्र आव्हाड हे आपल्या गाडीतून उतरताच तो पुढे आला अन् आपण रिक्षा घेतलीय, असे सांगितले. त्यावेळेस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी रिक्षाच्या ड्रायव्हर सिटवर बसून चक्क रिक्षा चालविली.