Homeठाणे-मेट्रोअपघाताने रोखला एक तास मुंब्रा बायपास ; ट्रक चालक किरकोळ जखमी

अपघाताने रोखला एक तास मुंब्रा बायपास ; ट्रक चालक किरकोळ जखमी

ठाणे: गुजरात वरून कर्जतकडे निघालेल्या ट्रक चालकाचा मुंब्रा बायपास रोडवर ट्रकवरील ताबा सुटला आणि तो ट्रक मुंब्रा बायपासच्या उतारावरती रोडच्या बाजूला उभा असलेल्या रिकाम्या कंटेनरला पाठीमागून जावून धडकला. हा अपघात शुक्रवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास समोर आला. यावेळी अपघातग्रस्त ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेला चालक रियाज अहमद ( ४८ ) हा किरकोळ जखमी झाला असून या अपघाताने ठाण्याकडून मुंब्राकडे जाणारा
मुंब्रा बायपास रोड एक तास रोखून धरला होता.
जखमी ट्रक चालक रियाज हा गुजरात येथून २८ टन रेती घेऊन कर्जत येथे मुंब्रा बायपास रोडने निघाला होता. शुक्रवारी पहाटे मुंब्रा बायपास रोडने तो ट्रक घेऊन निघालेल्या रियाज याचा त्या ट्रकवरील ताबा अचानक सुटला आणि तेथेच उतारावरती रोडच्या बाजूला उभा असलेल्या रिकाम्या कंटेनरला पाठीमागून जावून धडकला. ही धडक इतकी जोरात होती की ट्रकच्या केबिनमध्ये चालक रियाज हा अडकून पडला होता. या अपघाताची माहिती पोलीस हवालदार शामराव पाटील यांनी ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिल्यावर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि वाहतूक पोलीस या विभागांनी धाव घेतली. तसेच अडकलेल्या चालकाची सुखरूप सुटका केली. या अपघातात चालक रियाज याच्या पायाला आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून त्या दोन्ही वाहने रस्त्याच्या एकाला बाजूला केल्यावर वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

error: Content is protected !!