Homeठाणे-मेट्रोअबब ..! ठाण्यात १४ दुकाने फोडली ; २७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमालावर...

अबब ..! ठाण्यात १४ दुकाने फोडली ; २७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमालावर डल्ला

ठाणे :- येथील चरई परिसरात एकाच वेळी चोरट्यांनी तब्बल १४ दुकाने फोडल्याची बाब बुधवारी सकाळी समोर आली आहे. यातील आठ दुकानांमधून चोरट्यांनी २७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे. चोरीचा प्रकार सकाळी ६ ते ६.३० या कालावधीत घडलेला आहे. तर एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक जण तसेच दुकान बाहेर ही शटर उचकताना एक जण कैद झाला असून त्यानुसार चोरट्यांचा शोध आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चरईत बुधवारी सकाळी जनरल स्टोअर, क्लिनिक, आयुर्वेदिक जडीबुटी भांडार आदी १४ व्यावसायिक दुकाने उघडण्यास आल्यानंतर त्यांना दुकानांचे शटर उचकटल्याचे आढळले. या घटनेची माहिती नौपाडा पोलिसांना मिळाल्यानंतर नौपाडा पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. १४ दुकानांपैकी आठ दुकानांमधून २७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे समोर आले. याप्रकरणी दुकानदाराने दिलेल्या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

error: Content is protected !!