दिवा:-शिवसेना शहर महिला आघाडीच्या माध्यमातून अर्चना निलेश पाटील यांनी राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचे आयोजन दिवा शहरात केले आहे.
शनिवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता सदर स्पर्धा आयोजित केली जाणारअसून,ही स्पर्धा आकांक्षा हॉल बी आर नगर दिवा पूर्व येथे संपन्न होणार असल्याची माहिती अर्चना निलेश पाटील यांनी दिली आहे.या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला 21 हजार रुपये रोख, द्वितीय पारितोषिक 11000 व तृतीय पारितोषिक 7000 अशी बक्षीस दिली जाणार आहेत.उत्कृष्ट उखाणा पाच प्रेक्षक महिलांसाठी सुंदर पैठणी दिली जाणार असल्याची माहिती आयोजक अर्चना पाटील यांनी दिली आहे.