दिवा – अनधिकृत बॅनर व होर्डिंग मुळे दिवा शहर बकाल झाले असून शहरातील अनधिकृत होर्डिंग व बॅनर हटवण्याची मागणी वंचित बहुजन विकास आघाडीचे विकास इंगळे यांनी केली आहे.
शहरातील बहुतांश जाहिराती बेकायदेशीर असून ठाणे महानगरपालिकेच्या आवश्यक परवानग्या घेतल्या शिवायच प्रदर्शित केल्या जात असल्याकडे इंगळे यांनी लक्ष वेधले आहे.
बेकायदेशीर बॅनर, होर्डिंग्जमुळे शहर सौंदर्यकरणाचा प्रश्न निर्माण होत असून त्याचबरोबर रस्ता सुरक्षेसाठी देखील हा एक मोठा धोका असल्याचे इंगळे यांनी म्हटले आहे.
अनेक शिक्षण संस्था सुद्धा जणू काही आपण अधिकृत असल्याचा आव आणत शहरभर अनधिकृत होर्डिंग, बॅनर लावून दिवा शहराला विद्रुप करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.तर ठा.म.पा कडूनही दर वर्षी अनधिकृत शाळांवर कारवाई करणार अश्या आशयाचे बॅनर अवैध ठिकाणी लावून स्वतः अनधिकृत कृती करतात. अशा संस्थांनावर सुद्धा शहर विद्रुपकरण्याच्या कायद्याखाली कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे विकास इंगळे यांनी व्यक्त केले.
ठाणे महानगरपालिकेने या बेकायदेशीर बॅनर, होर्डिंग्जवर तात्काळ कारवाई करून सर्व बॅनर हटावण्यात यावेत व असे बेकायदेशीर बॅनर लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी इंगळे यांनी केली आहे.