दिवा:-भाजपा दिवा शीळ मंडळांची नवी कार्यकारिणी जाहीर झाली असून गुजराती सेलचे अध्यक्ष म्हणून काम पाहणारे अशोक सोलंकी यांना पुन्हा भाजपने गुजराती सेल अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.या नियुक्ती नंतर सोलंकी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
समाजसेवक अशोक सोलंकी यांची पुनः गुजराती सेल अध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांच्या समर्थकांनी समाधान व्यक्त केले आहे. वेगवेगळे कार्यक्रम राबवून समाजसेवेत कार्यरत असलेले अशोक सोलंकी हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.
अशोक सोलंकी यांच्या पद नियुक्ती वेळी ठाणे जिल्हा शहर अध्यक्ष संजय वाघुळे आणि दिवा शीळ मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांची प्रमुख उपस्थिती होती. अशोक सोलंकी यांच्या नियुक्ती वेळी त्यांची पूर्ण गुजराती टीमचे सहकारी हजर होते. हर्षाबेन, विणूबेन, अशोक पटेल, किशन वालेरा, मिनू गोहिल, भाग्यश्री पटेल, महेश जागरिया, किशोर दंतानी, किरण सोलंकी, सोनाबेन जगरिया, जिनल सोलंकी इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.