Homeशहर परिसरअशोक सोळंकी आयोजित आरोग्य शिबिर संपन्न

अशोक सोळंकी आयोजित आरोग्य शिबिर संपन्न

दिवा:- दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दिवा भाजपच्या गुजराती सेलचे अध्यक्ष अशोक सोलंकी यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात फुल बॉडी चेकअप, विविध रोगांवर आयुर्वेदिक उपचार, डायबिटीज, ब्लडप्रेशर, किडनी स्टोन,सायनस, थायरॉईड इत्यादी आजारावर मोफत उपचार व मार्गदर्शन नागरिकांना मिळाले. सदर शिबिर नितेश अपार्टमेंट 2, बेडेकर नगर, दिवा आगासन रोड, दिवा पूर्व येथे 15 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत करण्यातआले. या शिबिराचे आयोजन अशोक सोलंकी यांनी केले . कार्यक्रमास दिवा भाजप महिला अध्यक्षा ज्योती पाटील यांसह अनेकजण उपस्थित होते.

error: Content is protected !!