ठाणे :- ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी ठाण्याच्या कोर्ट नाका येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात असलेल्या शिधावाटप कार्यालयाला अचानक भेट दिल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.
आ. केळकर यांच्या मुळेच आय. एस. ओ. मानांकन मिळालेल्या या शिधावाटप कार्यालयात केलेल्या कामात पी डब्लू डि कडून दुर्लक्ष झाल्याने आ. केळकर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून घेतले. यावेळी रेशनिंग कार्यालयाच्या मुख्य अधिकारी चव्हाण मॅडम, पी डब्लू डि चे सचिन पाटिल व अधिकारी वर्ग उपस्थित होता.
आ. केळकर यांनी पी डब्लू डि च्या माध्यमातून पडझड झालेल्या या शिधावाटप कार्यालयाचा कायापालट केला होता. त्यामुळे या कार्यालयाला आय. एस. ओ. मानांकन मिळाले होते. आज या कार्यालयाला आ. केळकर यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी कामासाठी आलेल्या नागरिकांनी आ. केळकर यांची भेट घेऊन संवाद साधला.
या कार्यालयात पाहणी करताना आ. केळकर यांना बाथरूम ची दुरावस्था दिसून आली तसेच पत्रा, स्लॅप ची वरून गळती सुरु आहे, या कार्यालयाच्या आवारात असलेले जांभळाचे झाड पडायला आले आहे. आणि ते कार्यालयावर केव्हाही पडू शकते शिवाय मधल्या वाटेवर पेव्हर ब्लॉक लागणे आवश्यक असल्याचे आ. केळकर यांच्या पाहणी दरम्यान निदर्शनास आले. परिसरात घाण दिसून आली. या सर्व बाबी पाहणी दरम्यान निदर्शनास आल्यावर आ. केळकर यांनी पी डब्लू डि अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. तातडीने ही सर्व कामे पूर्ण करावी अशा सूचना यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी अधिकाऱ्यांनी 10 – 12 दिवसात कामे पूर्ण करणार असल्याचे आ. केळकर यांना सांगितले.
शिधावाटप कार्यालय हे पब्लिक प्लेस आहे. येथे नागरिकांची दररोज ये जा असते. त्यामुळे हे कार्यालय सुस्थितीत असणे आवश्यक आहे. पी डब्लू डि अधिकाऱ्यांनी लवकर काम पूर्ण होणार असल्याचे जरी सांगितले असले तरी मी पुन्हा या कार्यालयास भेट देणार असल्याचे आ. केळकर यांनी बोलताना सांगितले.