उपक्रमात आता पर्यंत शेकडो विविध विषय मार्गी लावण्यात आ. केळकरांना यश..
ठाणे:- आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या समस्या, अडचणी समजून घेण्याकरिता तसेच त्यांच्याशी संवाद साधण्याकरिता दर सोमवारी व शुक्रवारी ठाण्याच्या खोपट येथील भाजपा कार्यालयात ‘जनसेवकाचा जनसंवाद’ या उपक्रमाच्या माध्यमातून सकाळी 10.30 ते दु. 1 पर्यंत उपस्थित असतात. आता पर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून आ. केळकर यांना शेकडो विविध विषय मार्गी लावण्यात यश आले आहे. आ. केळकर यांच्या कामाच्या शैलीबाबत नागरिकांनी अनेक वेळा समाधान व्यक्त केले आहे. एक दृढ विश्वास त्यांच्याबाबत सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
आजही आ. केळकर हे नागरिकांना भेटण्यासाठी खोपट कार्यालयात उपस्थित होते. महापालिका अतिक्रमण विभाग, डी. डी. आर. विभाग, अंबरनाथ येथील विकासकाने केलेली फसवणूक विषय, कळवा रुग्णालयातील नर्स, आया वारस हक्क विषय, पगार थकबाकी विषय, निराधार योजना विषय, ऍडमिशन विषय, विवीध गृहसंकुलातील कमिटी सभासद विषय असे अनेक विविध विषय आ. केळकर यांच्यासमोर नागरिकांनी मांडले. त्यातील ऍडमिशन विषय, डी सी आर विभागातील विषय, अंबरनाथ येथील विकासकाने जेष्ठ महिला नागरिकाची केलेली फसवणूक विषय, महानगर गॅस चे काम केलेल्याचे पेमेंट ठेकेदाराने अडकवून ठेवले होते ते परत होणे बाबत, ठा म पा अतिक्रमण विषय, हे विषय तिथेच संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून आ. केळकर यांनी सोडविले. त्यामुळे या उपक्रमात येणार प्रत्येक नागरिक हा समाधानाने परत जाताना दिसत होता.
माझ्याकडे तक्रार घेऊन येणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकांचे काम झाले पाहिजे याबाबत मी प्रयत्नशील असतो. आपले प्रयत्न प्रामाणिक असतील, त्यात कोणताही स्वार्थ नसेल तर काम नक्की मार्गी लागतं हा माझं अनुभव आहे. माझ्याकडे अनेक नागरिक तक्रारी घेऊन येत असतात, त्यात कोणी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, दादर, कुर्ला, पूणे, शहापूर अशा विविध भागातूनही नागरिक येत असतात. अनेकांची कामे मार्गीही लागली आहेत याचे मला समाधान आहे. लोकसहभाग, लोकचळवळ, लोककल्याण या त्रिसूत्रिवर माझे काम सुरु असून माझ्याकडे येणाऱ्या नागरिकाच्या चेहऱ्यावरील आनंदाचा क्षण हा माझ्यासाठी मोलाचा क्षण असल्याची भावना आ. केळकर यांनी बोलताना व्यक्त केली.