दिवा:- जेव्हा आम्ही भाजप मधून शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी आम्हाला गद्दार म्हणणारे रोहिदास मुंडे यांनी स्वतः ठाकरे च्या शिवसेनेत प्रवेश केला, तेव्हा ते स्वतःला काय म्हणणार? असा खरमरीत सवाल शिंदेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख निलेश पाटील यांनी विचारला आहे.
जेव्हा आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करतो तेव्हा आम्हाला गद्दार म्हणून हेच माजी अध्यक्ष महाशय बोलत असतात,टीका करायचे आता तुम्हाला “गद्दार का खुद्दार” काय म्हणायचे? कोण स्वार्थासाठी आणि जनतेसाठी पक्ष प्रवेश करतो हे जनतेला समजले आहे.
मुंडे यांच्या पक्षप्रवाशामुळे ज्या पक्षात ते गेले आहेत तेथीलच कार्यकर्ते पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा निलेश पाटील यांनी बोलून दाखवली आहे .