Homeठाणे-मेट्रोआम्हाला बेघर करताय तर आम्हाला फाशी द्या, दिव्यातील त्या रहिवाशांचा आक्रोश

आम्हाला बेघर करताय तर आम्हाला फाशी द्या, दिव्यातील त्या रहिवाशांचा आक्रोश

दिवा:-हायकोर्टाच्या आदेशानंतर दिव्यातील तीन इमारतीवर कारवाई करण्यासाठी आलेल्या पालिका अधिकाऱ्यांचा निषेध येथील रहिवाशांनी आंदोलन करत केला.आमची घर खाली केली जाणार असतील तर आम्हाला फाशी द्या,अशा पद्धतीचा आक्रोश रहिवाशांनी यावेळी केला.
ज्या इमारतींवर हायकोर्टाच्या आदेशाने कारवाई होत आहे तेथील नागरिक मागील 18 वर्षांपासून या इमारतींमध्ये राहत आहेत पालिकेचा टॅक्स लाईट बिल पाणी बिल येथील नागरिक भरत असताना अचानक त्यांच्यावर कोसळलेल्या या संकटामुळे नागरिकांत संताप आहे. हायकोर्टाने आदेश दिल्याने पालिका अधिकारी या ठिकाणी कारवाईसाठी आले होते.त्यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचा जोरदार निषेध करत कारवाईला विरोध केला व प्रतिकात्मक स्वरूपात फाशीचे फलक लावून निषेध आंदोलन केले. जर आमच्या घरांवर कारवाई होणार असेल तर आम्हाला फाशी द्या असा आक्रोश यावेळी नागरिकांनी केला.

पालिकेने नागरिकांना दिलासा देण्यासाठी कायदेशीर तोडगा काढावा- विजय भोईर

“खरंतर या नागरिकांना योग्य तो तोडगा काढून दिलासा मिळण्याची गरज आहे.हायकोर्टाच्या आदेशाचा आदर ठेवून या ठिकाणी रहिवाशांना न्याय कसा देता येईल यासाठी पालिकेने पुढाकार घ्यायला हवा.18 वर्षांपासून येथील रहिवासी या इमारतींमध्ये वास्तव्य करत आहेत. एका क्षणात सर्व उद्ध्वस्त होणार असेल तर त्याचा विचार पालिका प्रशासन शहराचे पालक म्हणून करणार आहे की नाही? हा प्रश्न आहे! – विजय भोईर, भाजप

error: Content is protected !!