Homeशहर परिसरआषाढी एकादशी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

आषाढी एकादशी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

दिवा : – आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये रोटरी क्लब ऑफ दिवा-ठाणे यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये रक्तदात्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या दरम्यान ६३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. दिवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र तोरडमल यांनी रक्तदात्यांना प्रमाणपत्रे देऊन सन्मानित केले.

रक्तदान शिबिरासाठी रोटरी क्लब ऑफ दिवा- ठाणेचे अध्यक्ष किशोर पाटील, सचिव स्वप्निल गायकर, उपक्रमाचे प्रोजेक्ट हेड नंदकुमार किणे यांनी विशेष मेहनत घेऊन उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.
या उपक्रमावेळी विकास गुंजाळ, हर्षद भगत, साईनाथ म्हात्रे, अभिजीत आलीमकर, अभिजीत ठाकूर, गणेश टावरे, नवनीत पाटील, वैष्णव पाटील, महेंद्र दळवी तसेच बहुसंख्य नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.

रोटरी क्लब ऑफ दिवा- ठाणे अध्यक्ष किशोर पाटील यांनी याप्रसंगी रक्तदात्यांचे, विठ्ठल मंदिर सेवा समितीचे तसेच क्लबच्या सदस्यांचे आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!