Homeशहर परिसरआ.निरंजन डावखरे यांच्या निधीतून दिव्याला मिळाले ई टॉयलेट,80 बसण्याची बाकेही नागरिकांसाठी सुपूर्द

आ.निरंजन डावखरे यांच्या निधीतून दिव्याला मिळाले ई टॉयलेट,80 बसण्याची बाकेही नागरिकांसाठी सुपूर्द

दिवा:-भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते दिवा येथे पहिल्यांदाच डावखरे यांच्या आमदार निधीतून ई टॉयलेट व बसण्यासाठी बेंचेस देण्यात आल्या, याचे उद्घाटन करण्यात आले.
दिवा शहरात पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी भाजपने अनेक वेळा आवाज उठवला आहे.दिव्यात सार्वजनिक सौचालय नसल्याने अनेकांची गैरसोय होत होती .नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी आमदार निरंजन डावखरे यांनी आपल्या आमदार निधीतून ई टॉयलेट उपलब्ध करून दिले आहे.या टॉयलेट चे लोकार्पण नुकतेच पार पडले. यावेळी ठाणे शहर संघटक सरचिटणीस विलासजी साठे दिवा मंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे ठाणे शहर जिल्हा ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष विनोद भगत ठाणे शहर कार्यकारणी सदस्य अशोक पाटील विजय भोईर गणेश भगत मंडल सरचिटणीस दिलीप भोईर समीर चव्हाण युवराज यादव युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर महिला मोर्चा अध्यक्षा ज्योती पाटील ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष अजय सिंग व्यापारी सेल अध्यक्ष जयदीप भोईर अंकुश मढवी वार्ड अध्यक्ष नागेश पवार प्रकाश पाटील राजश्री मुंडे सीमा भगत मृणाल भगत अमरनाथ गुप्ता अवधराज राजभर निलेश भोईर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!