Homeठाणे-मेट्रोउपवन पाठोपाठ वाघबीळ येथे कचरा पेटला

उपवन पाठोपाठ वाघबीळ येथे कचरा पेटला

ठाणे:- उपवन येथील मोकळ्या जागेत टाकलेल्या कचऱ्याला आग लागल्याची घटना ताजी असताना, शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वाघबीळ जुना गाव या ठिकाणीही मोकळ्या जागेत टाकलेल्या कचऱ्याला लागली. त्या आगीच्या झळीने तेथील सुक्या गवतानेही पेट घेतला. या आगीच्या घटनांनी मोठ्याप्रमाणात त्या परिसरात धूर पसरल्याचे पाहण्यास मिळाले.
वाघबीळ जुना गाव येथे कचरा पेटून लागलेल्या आगीने मोठ्याप्रमाणात धूर पसरला आहे. अशी माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर शर्थीचे प्रयत्न सुरू केल्यावर आगीवर जवळपास तीन तासांनी नियंत्रण मिळविण्यात यश आले. यावेळी,
०२ फायर वाहनांसह १ रेस्क्यू वाहन पाचारण केले होते. तसेच सुदैवाने याघटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

error: Content is protected !!