Homeशहर परिसरएकनाथ भगत यांच्या निधनाने दिवा शहराची सामाजिक हानी - अँड.आदेश भगत

एकनाथ भगत यांच्या निधनाने दिवा शहराची सामाजिक हानी – अँड.आदेश भगत

दिवा:-शहरातील रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) चे प्रमुख नेते एकनाथ भगत यांच्या निधनाने शहराची सामाजिक हानी झाली असल्याचे मत शिवसेना उपशहरप्रमुख अँड. आदेश भगत यांनी व्यक्त केले आहे.

आगरी समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या आगरी युवक संघटना (आयुस) च्या संघर्षाच्या काळात एकनाथ भगत यांची लढाऊवृत्ती सर्वांनी बघितली होती. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन, हा विचार समाजाच्या तळागाळात पोहचावा म्हणून आयुष्य वेचणारे व्यक्तिमत्व म्हणूनही ते ओळखले जात होते. आंबेडकरी चळवळीचा खंदा कार्यकर्ता म्हणून कार्य करत असताना दिवा शहरात सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठीची त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. आज त्यांच्या अकाली जाण्याने दोन समाजामधील दुवा हरपला असल्याचे मत अँड.आदेश भगत यांनी व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!