ठाणे:- टेलिग्राम वरती मेसेज करून गुगल वर जाऊन विविध हॉटेल्स रेस्टॉरंट यांना रेटिंग रिव्ह्यू आणि कमेंट करण्याचे टास्क देऊन पैसे कमावण्याच्या बहाण्याने नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या एका चौकडीला मुंब्रा पोलिसांनी मुंबईतील कुर्ला येथून अटक केली. त्यांच्याकडून सात मोबाईल फोनसह ३७ एटीएम कार्ड, ३६ चेक बुक व ३ लॅपटॉप, ३ पासबुक, १६ सिम कार्ड तसेच इतर साहित्य जप्त केले आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या ४८ तासात उघडकीस आणला आहे.
मुंब्रा पोलीस ठाण्यात १० फेब्रुवारी २०२५ रोजी अशाप्रकारे फिर्यादी एक महिलेची ४० हजारांची ऑनलाइन फसवणूक केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याच्या तपासात मुंब्रा पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने गुन्ह्यात वापरण्यात आलेले टेलिग्राम आयडी यांची माहिती प्राप्त करून त्याचे आयपीडीआर तसेच नमूद गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या अकाउंट ची माहिती प्राप्त करून त्यात रजिस्टर असलेले मोबाईल नंबर यांचे सी डी आर, आय पी डी आर तसेच रजिस्टर ईमेल आयडी यांचे आयपीडीआर बाबत तांत्रिक माहिती प्राप्त करून दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोजी कुर्ला पश्चिम बुद्ध कॉलनी येथे जाऊन छापा टाकला. तसेच यावेळी तेथून चौघांना अटक त्यांच्याकडून ७ मोबाईल्स, ३७ एटीएम कार्ड, ३६ चेक बुक व ३ लॅपटॉप, ३ पासबुक, १६ सिम कार्ड तसेच इतर साहित्य मिळून आले असून त्यांनी पाहिजे असलेल्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास मुंब्रा पोलीस करत असल्याची माहिती ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे जनसंपर्क अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली.