Homeकोकण-महाराष्ट्रऔरंगजेबाची कबर हटवण्यासाठी शिवसेना आमदार आक्रमक

औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी शिवसेना आमदार आक्रमक

विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत शिवसेनेचे आंदोलन

मुंबई :-छत्रपती संभाजी महाराजांचा क्रूर छळ करणाऱ्या औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी शिवसेना आमदारांनी आज विधान भवनातील पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. या आंदोलनात मंत्री भरत गोगावले, मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विजय शिवतारे, आमदार संतोष बांगर, आमदार आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार संजय गायकवाड यासह अनेक आमदार उपस्थित होते.

औरंगजेबाचा धिक्कार करत शिवसेना आमदारांनी कबर हटवण्याची मागणी केली. औरंग्याची कबर हटवून तिथं केवळ थडगं ठेवा. थडग्याजवळ चार जोडे ठेवावेत म्हणजे येणारे जाणारे थडग्याला जोडे मारतील, अशी टीका मंत्री भरत गोगावले यांनी केली. औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांना हिंदुस्थानात राहण्याचा अधिकार नाही अशी टीका आमदार संतोष बांगर यांनी केली.शंभू राजांचा अमानूष छळ करणाऱ्या औरंग्याची कबर उखडून टाका असे बॅनर यावेळी शिवसेना आमदारांनी यावेळी झळकवले.

error: Content is protected !!