दिवा:-एका 80 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला कचरा गाडी चालकाने फरपटत नेल्याने सदर ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना दिव्यात घडली.
दिव्यातील संतोष नगर येथील सिताराम थोटम हे 80 वर्षाचे जेष्ठ नागरिक पायी जात असताना निष्काळजीपणे उलट्या दिशेने गाडी चालवणाऱ्या महापालिका कचरा गाडीच्या चालकाने त्यांना जोरदार धडक देत फरपटत नेले.यात गंभीर जखमी झालेल्या थोटम यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.दरम्यान पोलिसांनी आरोपी मनोज कदम याला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी करत आहेत. या अपघाताच्या घटनेबाबत नागरिकांतून चालका विरोधात संताप व्यक्त होत आहे.चालकाच्या निष्काळजीकपणामुळे थोटम यांना आपला जीव गमवावा लागल्याने नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.