Homeठाणे-मेट्रोकनिष्ठ महाविद्यालयांच्या बायफोकल अभ्यासक्रमाच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी

कनिष्ठ महाविद्यालयांच्या बायफोकल अभ्यासक्रमाच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी

भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची विनंती

ठाणे :- अकरावीच्या बायफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमासाठी राज्य सरकारकडे कनिष्ठ महाविद्यालयाकडून सादर झालेल्या योग्य प्रस्तावांना मान्यता द्यावी, अशी विनंती भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली आहे.
बायफोकल अभ्यासक्रमाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेशासाठी ५ जून रोजी मुदत होती. मात्र, राज्यातील अनेक महाविद्यालयांचे बायफोकल अभ्यासक्रमांना मान्यता देण्याचे प्रस्ताव कौशल्य विकास विभागाकडे अंतिम शासन निर्णय घेण्यासाठी प्रलंबित आहेत, याकडे भाजपाचे कोकण पदवीधर प्रकोष्ठ संयोजक सचिन बी. मोरे यांनी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले होते. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांकडून सहसंचालक, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाकडे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावाला शासन निर्णय काढण्यासाठी मंत्रालयात पाठविण्यात आले आहे. या प्रस्तावांना मंत्रालयातून अजून मान्यता न मिळाल्यामुळे शेकडो महाविद्यालयात बायोफोकल अभ्यासक्रमांसाठी हजारो विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे.
या प्रश्नावर रवींद्र चव्हाण यांनी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांना पत्र पाठवून कनिष्ठ महाविद्यालयांच्या योग्य प्रस्तावांना मान्यता देण्याची विनंती केली आहे.

error: Content is protected !!