Homeशहर परिसरकल्याण ग्रामीण मधून शिवसेना शिंदे गटाकडून मा.उपमहापौर रमाकांत मढवी उमेदवार?

कल्याण ग्रामीण मधून शिवसेना शिंदे गटाकडून मा.उपमहापौर रमाकांत मढवी उमेदवार?

मनसे स्वतंत्र लढणार असल्याने युतीत शिवसेना शिंदे गटाकडे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ
■ सुहास खंडागळे
दिवा:-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून ठाणे महापालिकेचे माजी उपमहापौर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय रमाकांत मढवी हे प्रबळ दावेदार असल्याची चर्चा स्थानिक राजकारणात आहे.तशी तयारी पुन्हा लोकसभा निवडणुकी नंतर मढवी समर्थकांकडून सुरू असल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे दिवा शहर व कल्याण ग्रामीण मधील प्रमुख नेते माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी मतदार संघात बांधणी सुरू केली होती. लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांच्यावर लोकसभा निरीक्षक ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. मात्र लोकसभेत भाजप-मनसे -शिवसेना अशी महायुती असल्याने कल्याण ग्रामीण मधील तिन्ही पक्षाचे पदाधिकारी, नेते हे खांद्याला खांदा लावून काम करताना दिसले.
सध्या कल्याण ग्रामीण मध्ये मनसेचे विद्यमान आमदार राजू पाटील असून पुन्हा त्यांनाच मनसे कडून संधी मिळणार आहे. राजू पाटील यांनी देखील मतदार संघात यापूर्वीच बांधणी सुरू केली आहे. मनसेने स्वतंत्र निवडणुका लढण्याची घोषणा केल्याने युतीच्या जागा वाटपात कल्याण ग्रामीण हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला असल्याने कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवार उतरवला जाण्याची दाट शक्यता आहे. जागा वाटपात कल्याण ग्रामीण ची जागा शिवसेना शिंदे गटाला सुटल्यास येथून ठाणे महापालिकेचे माजी उपमहापौर व दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी यांना विधानसभेची तिकीट मिळण्याची शक्यता अधिक आहे. मढवी यांनी लोकसभेपूर्वीच कल्याण ग्रामीण मतदारसंघात बांधणी सुरू केली होती. दरम्यानच्या काळात लोकसभेला मनसे सोबत युती झाल्याने हा मतदारसंघ मनसेला सुटेल अशी चर्चा होती. मात्र आता मनसे स्वतंत्र लढणार असल्याने शिवसेना शिंदे गटाकडून रमाकांत मढवी यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.त्या दृष्टीने रमाकांत मढवी यांचे कार्यकर्ते कामाला लागल्याची चर्चा दिवा शहर व ग्रामीण भागात आहे. कार्यकर्त्यांकडून मढवी यांचे भावी आमदार अशा आशियाच्या पोस्ट व स्टेटस व्हाट्सअप ला ठेवले जात आहेत.शिवसेना शिंदे गटाकडून रमाकांत मढवी यांनी तयारी सुरू केल्याने येथील लढत चुरशीची होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या घडीला मनसे, शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट या पक्षांकडून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात बांधणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
error: Content is protected !!